गडचिरोली जिल्ह्यात आज 119 कोरोनामुक्त तर नवीन 284 कोरोनाबाधित

112

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 1017 कोरोना तपासण्यांपैकी 284 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 119 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आतापर्यंत बाधित 32876 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30871 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1253 झाली आहे. आतापर्यंत जिल्हयात एकुण 752 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.90 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.81 टक्के तर मृत्यू दर 2.29 टक्के झाला आहे.

 आज नवीन 284 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 139, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 3, चामोर्शी तालुक्यातील 38, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 4, मुलचेरा तालुक्यातील 24, कोरची तालुक्यातील 3, कुरखेडा तालुक्यातील 14, सिरोंचा तालुक्यातील 13, आणि वडसा तालुक्यातील 6 जणांंचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 119 रुग्णांंमध्ये गडचिरोली तालुक्यातील 64, अहेरी तालुक्यातील 6, आरमोरी तालुक्यातील 2, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 5, धानोरा तालुक्यातील 4, एटापल्ली तालुक्यातील 1, सिरोंचा तालुक्यातील 2, कोरची तालुक्यातील 4, मुलचेरा तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 1 आणि वडसा तालुक्यातील 21 जणांंचा समावेश आहे.