गडचिरोली जिल्ह्यात आज 111 कोरोनामुक्त, नवीन 169 कोरोनाबाधित

71

विदर्भ क्रांती न्यूज

 गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 902 कोरोना तपासण्यांपैकी 169 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 111 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 31946 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30457 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 738 झाली आहे. आतापर्यंत जिल्हयात एकुण 751 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.34 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.31 टक्के तर मृत्यू दर 2.35 टक्के झाला आहे. आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 104, अहेरी तालुक्यातील 7, आरमोरी तालुक्यातील 2, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 5, धानोरा तालुक्यातील 16, एटापल्ली तालुक्यातील 1, मुलचेरा तालुक्यातील 3, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 15 आणि वडसा तालुक्यातील 7 जणांंचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 111 रुग्णांंमध्ये गडचिरोली तालुक्यातील 50, अहेरी तालुक्यातील 38, आरमोरी तालुक्यातील 2, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 3, धानोरा तालुक्यातील 3, एटापल्ली तालुक्यातील 4, सिरोंचा तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 2 आणि वडसा तालुक्यातील 7 जणांंचा समावेश आहे.