कोविड काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करा

101

– आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोविड-१९ च्या वैश्विक महामारीच्या पहिल्या लाटेपासून ते आजपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालय गडचिरोली येथे कोविड- १९ महामारीमध्ये अविरत सेवा केलेल्या आणि सध्या पण कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मागील माहे जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंतचे मानधन मिळाले नसून, लवकरात लवकर त्यांची थकीत मानधन मिळवून देण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यान्नी आज जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनाला अनुसरून जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी बहुसंख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.