सेवानिवृत्त बेलिफ कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभात शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन केला सत्कार

285

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काल ३१ डिसेंबर २०२१ रोजी नियत वयोमानानुसार वयाची ५८ वर्ष पूर्ण करुन शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी श्री. बी. डी. वासेकर, प्रमुख बेलिफ आणि श्री. ए. एच. घोडाम, प्रमुख बेलिफ दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) गडचिरोली यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. यु. बी. शुक्ल, प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे जिल्हा न्यायाधीश – १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. यु. एम. मुधोळकर, गडचिरोलीचे जिल्हा न्यायाधीश -२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. डी. जी. कांबळे, गडचिरोलीचे प्रभारी दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) श्री. आर.आर. खामतकर, गडचिरोलीच्या अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) एन. सी. सोरते मॕडम, जिल्हा न्यायालय गडचिरोलीच्या प्रबंधक सौ. ए. एस. घरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी श्री. बी. डी. वासेकर व श्री. ए. एच. घोडाम यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सर्व न्यायालयीन कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्री. एम. एम. पुणेकर, प्रास्ताविक श्री. पी. एस. ठाकरे व आभारप्रदर्शन श्री. जेट्टीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. आर. आर. दरडे, आर. टी. फुकटे, बी. के. खोब्रागडे, ए. डी. मून, ए. बी. कोंडावार, सौ. एल. व्ही. उके, एन. एम. रामटेके, एम. एम. लभाने, एन. एल. टिंगुसले आदी बेलिफांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.