पोटेगाव आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उजाळा : नववर्षाचे उत्साहात स्वागत

172

– प्रश्नमंजुषा, विविध खेळांचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे शनिवारला उत्साहात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांची उधळण करण्यात आली.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र पोटेगावच्या आरोग्य सेविका मोहिता गोरेकर, ज्येष्ठ मध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, प्रमिला दहागावकर, के. पी. मेश्राम, पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार, जेष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसु, व्ही. एम. नैताम, एन. पी. नेवारे, अधीक्षक एस. आर. जाधव, क्रीडा शिक्षिका प्रीती क्षिरसागर, कला शिक्षक प्रमोद पवार, संगणक शिक्षक रजत बारई आदी उपस्थित होते.
नववर्षाच्या आगमनानिमित्ताने विद्यार्थ्यांची चार गटात प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. नृत्य, संगीत खुर्ची, चमचा गोळी स्पर्धेसह कब्बडी, खो- खो, व्हॉलिबॉल आदी खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतल्याने त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळाला.
कार्यक्रमाचे संचालन सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व्ही. के. नैताम, प्रशांत बोधे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.