तेली समाज बांधवांनी श्री संत जगनाडे महाराज रथ यात्रा व समाज जोडो तथा ओ.बि.सी.जागर अभियानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे :  इंजि. प्रमोदजी पिपरे 

90

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज रथ यात्रा व समाज जोडो तथा ओबीसी जागर अभियान २६ डिसेंबर रोजी रविवारला सकाळी ११ वाजता हनुमान वार्ड येथील आठवडी बाजाराजळील हनुमान मंदिरात प्रथमतः रथ यात्रेचे स्वागत होईल. हनुमान मंदिर येथुन रथ यात्रेला प्रारंभ होवुन स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव भवन येथे समारोप होणार आहे. तरी जिल्ह्यातील समस्त तेली समाज बांधवांनी अभियानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा (उत्तर) जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.
अभियानाचे आयोजन तैलिक महासभा गडचिरोली, संताजी सोशल क्लब गडचिरोली, संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली, विदर्भ तेली महासंघ गडचिरोली, श्री.संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशीय संस्था गडचिरोली यांनी केले आहे.