– आम्ही आमच्या आरोग्यासाठी व मावा संस्थेचा पुढाकार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा येथील श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा व मावा संस्था मुंबईच्या पुढाकाराने 17 व 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुनघाटे महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या चित्रपट महोत्सवात जागतिक दर्जाचे व अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. मावा ही संस्था संपूर्ण भारतात स्त्री व पुरुष समानता व तरुणाईच्या प्रश्नावर काम करीत आहे. ‘समभाव’ या मुख्य विषयाला गाभा मानून स्त्री व पुरुष समानता, स्त्री – पुरुष संबंध या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा अधिकाधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते, तरुण चित्रपट निर्माते, नाट्य कलावंत व परिसरातील जनतेने घ्यावा, असे आवाहन दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले आहे. हे चित्रपट महोत्सव नि:शुल्क असून ज्यांना या महोत्सवाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपले नाव प्रा. भास्कर तुपटे यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले आहे.