सुदृढ आरोग्यासाठी खेळण्यावर भर द्या : विलास दशमुखे

112

– मारकबोडी येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन)
गडचिरोली : आजच्या काळात आरोग्याला अतिशय महत्त्वाचे स्थान असून आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व नियमित सुदृढ आरोग्य राहण्यासाठी खेळण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन गडचिरोली पंचायात समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांनी केले. नवयुवक क्रिकेट मंडळ मारकबोडी यांच्या सौजन्याने तालुक्यातील मारकबोडी येथे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून डोंगरगावच्या ग्रामपंचायतच्या सदस्या प्रा. रुपाली पापडकर, रुषीकांत पापडकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा पं. स. सदस्य रामरतन गोहणे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, मुख्याध्यापक देविदास गणवीर, पोलीस पाटील पंडितराव मेश्राम वनरक्षक वाढई, उपसरपंच पोर्णिमा पाकलवार, ग्रामपंचायत सचिव मोहुर्ले आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना दशमुखे म्हणाले की, कोणत्याही खेळामुळे माणसाच्या शारीरिक हालचाली होऊन शरीराला व्यायाम मिळतो व त्यातून शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे माणसाने थोडावेळ तरी व्यायामासाठी अथवा खेळासाठी आवर्जून वेळ काढावा, असेही ते म्हणाले.
वर्षातून एकदा तरी गावांमध्ये असे खेळांचे आयोजन करत राहल्यास खेड्यातील खेळाडूंनाही वाव मिळत असून पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आपल्यातून निर्माण होऊ शकतो. अंतिम सामन्यापर्यंत गावामध्ये क्रिकेटमय वातावरण राहणार आहे. त्यामुळे परिसरातील गावकर्‍यांनी या स्पर्धेचा आनंद घेऊन खेळाडूंचाही आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहनही यावेळी उपसभापती दशमुखे यांनी केले. तसेच गावातील युवकांना खेळण्यासाठी क्रीडांगण तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आस्वासन दिले.
या सामन्यात प्रथम विजेत्या संघाला 30 हजार1, द्वितीय विजेत्यांना 15 हजार 1 तर तृतीय सामना विजेत्यांना 5 हजार 1 रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक प्रोत्साहन बक्षिससुद्धा देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील पंडित मेक्षाम यांनी केले संचालन व आभार रुपेश चुधरी यांनी मानले.