राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करावे : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

139

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या सेवा सप्ताह समारोपीय कार्यक्रम

गडचिरोली : संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. त्यांचा विचारांची आजच्या पिढीला नितांत आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगरच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान सेवासप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सेवा सप्ताहच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना नगराध्यक्ष बोलत होत्या. कार्यक्रमाला अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ गडचिरोलीचे जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथजी कुंभारे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, दलितमित्र नानाजी वाढई, अरविंद वासेकर, सुरेश मांडवगडे, देवरावजी भोगेवार, घनश्यामजी जेंगठे, अमलकृष्ण हलदर, देवरावजी मोगरकर, कवडुजी येरमे अमित तिवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रामकृष्ण ताजने यांनी केले. सेवा सप्ताह दरम्यान सामुदायिक ध्यान, शहरातील विविध भागातून रामधून, ग्रामगीता वाचन, विविध रचणात्मक कार्यक्रम, सामुदायिक प्रार्थना व विचार प्रकटन, आरोग्य शिबिर, रांगोळी स्पर्धा, महिला संमेलन इत्यादी बरेच कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सहभागी विजेत्यांना नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर भोयर, राजेंद्र भरडकर, चंद्रभान गेडाम, संदिप मेश्राम, रमेश उरकूडे, सुरेश फुलबांधे, लक्ष्मण आलाम, आनंद कुमरे, मनीषा उरकूडे, अर्चना नक्षे, संदेश नक्षीने यांनी प्रयत्न केले.