राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात गडचिरोलीत शिवसैनिक आक्रमक

78

– छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींंचा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांंनी केला निषेध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाला. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात असून याचे पडसाद गडचिरोलीत सुध्दा उमटले आहेत. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्या विरोधात शिवसैनिक व शिवभक्त आक्रमक झाले असून शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात काल शिवसेना जनसंपर्क कार्याल्यापासून स्थानिक इंदिरा गांधी चौकापर्यंत निषेध रैली काढण्यात आली. निषेध रैली इंदिरा गांधी चौकात पोहचताच  राज्यपालांच्या निषेधार्थ तिव्र घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. शिवाजी महाराजांचा अवमान करणारे राज्यपाल कोश्यारी यांची महाराष्टातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी कात्रटवार यांनी याप्रसंगी केली. महाराष्ट्र ही शूरविरांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज शूरविर पराक्रमी राजे होते. ते महाराष्ट्राचे दैवत आहेत उत्तम प्रशासक व रयतेचे राजे होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या शूरविर असा रयतेचा राजा पुन्हा या पृथ्वीतलावर कदापीही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. राज्यपालांसारख्या व्यक्तीने बेताल व्यक्तव्य करणे अशोभनिय आहे. राज्यपाल कोश्यारी यांना शिव़छत्रपतीच्या इतिहासाची माहिती नाही शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांचा अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि महाराष्टातील जनता आणि शिवसैनिक तो कदापीही सहन करणार नाही, असा इशारा कात्रटवार यांनी याप्रसंगी दिला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत बेताल वक्तव्य करून महाराष्टातील जनतेच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला पत्र लिहून पाच वेळा माफी मागितली होती, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्या त्रिवेदी यांनी शिवभक्तांची माफी मागावी, अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला. निषेध आंदोलनात संतप्त शिवसैनिकांंनी कोश्यारीच्या निषेदात प्रचंड घोषणाबाजी केली. राज्यपाल कोश्यारी हटाव महाराष्ट्र बचाव, क्षत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान करणाऱ्या कोश्यारींंचा निषेद असो, कोश्यारीचा समर्थन करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो, शिंदे सरकारचा निषेध असो, फड़णवीस सरकारचा निषेध असो, अश्या घोषणानी इंदिरा गांधी चौक परिसर  शिवसैनिकानी दनानून सोडला. या निषेध रैलीमध्ये शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, संदीप अलबनकर, अमित बानबले, संदीप भुरसे, सूरज उइके, दिलीप चनेकार, जगन चापडे, निकेश लोहबरे, राहुल सोरते, अरुण बरापात्रे, स्वप्निल खांडरे, तानबा दजगये, प्रशांत ठाकुर, हरिशबनबाले, प्रवीण मिसरी, रामदास भयाल, किशोर देशमुख, विनोद सयाम, रमाकांत चिंचोलकर, दिलीप सयाम, विनोद मुद्देमवार, ईश्वर लाजुकर, स्वप्निल मोहकर, योगेंद्र लाजुरकर, बलाजु फुकेट, डोमजी परचके, देवाजी कोरेववार, दिलकांत चारडुके, अनंता जमब्बेवार, हरीश बनबाले, चूडाराम हर्षे, गुलाब कमरे, साहिल भोयर, अंबादास मुनघाते, सुधाकर पीठले, दादाजी मुनघाते, राजू डोईजड, ओमकार मुनघाटे, मंगरु कुकडकर, लालाजी भयाल यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.