आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीचे जतन करावे : खा. अशोकजी नेते

20

– लखमापूर बोरी येथे क्रांतीसुर्य, जननायक, भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

Date :19 Nov 2022 Time : 04:31 PM

गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम लखमापुर बोरी (ता. चामोर्शी) येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोकजी नेते बोलताना म्हणाले, १५ नोव्हेबर हा दिवस देशात गौरव दिन म्हणून पाडला जातो.आदिवासी समाजातील संस्कृती ही जगातील सर्वात मोठी संस्कृती आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीचे जतन करणे आदिवासी समाजाची जबाबदारी आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करून जगातील इतर समाजाला आदिवासी संस्कृतीपासून एक प्रेरणा द्यावी, असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

सोबतच रॅली काढून गोडी नृत्यांसह पाहुण्यांचे स्वागत केले.खासदार अशोकजी नेते साहेब यांनी गावातील समस्या सुद्धा यावेळी जाणून घेतल्या. याप्रसंगी उद्घाटक मान. खासदार श्री.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, सरपंंचा किरणताई सुरजागडे, डॉ. तामदेव दुधबळे माजी जि. प. स., रेवनाथजी कुसराम माजी पं. स, मधुकर मडावी, नागेश गेडाम, रोशन कुंमरे, सुरेश मडावी, माणिक येरमे, साईनाथ कुळमेथे, सुमित्रा सातपुते माजी सरप़ंच, कल्पनाताई कुनघाडकर, पठान, पितांबर गेडाम, तसेच गावातील अनेक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.