रांगीत प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन

159

– आदिवासी विकास विभाग : ४० आश्रमशाळांच्या खेळाडूंचा विविध स्पर्धेत सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा क्रीडांगणावर गडचिरोली प्रकल्पतरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन रविवार दि. ९ ऑक्टोबरला थाटात पार पडले. उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी व मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष होते. प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेता चिरंजीव गड्डमवार, रांगीच्या सरपंच फालेश्वरी गेडाम, सामाजिक कार्यकर्ते शशीकांत साळवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक किरंगे, जगदीश कन्नाके, सहायक प्रकल्प अधिकारी चंदा मगर, निलय राठोड, प्रभु सादमवार, अनिल सोमनकर, सुधाकर गौरकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. वाय. भिवगडे, एस. आर. मैंद, विभागीय क्रीडा समन्वयक संदिप दोनाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मैनक घोष म्हणाले, आदिवासी विद्यार्थी कला क्रीडा गुणांनी निपुण आहेत. संधी मिळाल्यास त्यांचा भविष्य उज्वल आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे.
आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले, क्रीडा स्पर्धेतून स्फूर्ती घेऊन जीवनात जिद्द निर्माण करावी. शारीरिक विकासा सोबतच बौद्धिक गुणात्मक क्षमता वाढवावी. शासकीय आश्रमशाळांचा दर्जा सुधारला आहे. याचा फायदा आदिवासी विद्यार्थांनी घेऊन सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सर्वप्रथम लेझिमच्या तालावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रम दरम्यान रांगी आश्रमशाळेतील मुलांंमुलीने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले.

संमेलनात करवाफा, भडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १६ अनुदानित अशा एकूण ४० आश्रमशाळेतील एक हजार साठ खेळाडूंचा सहभाग आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे. स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण प्रदर्शित होणार आहे.
विद्यार्थिनी अनुष्का पुडो हिने खेळाडूंना तर पंचांंना प्राथमिक शिक्षक रामचंद्र टेकाम यांनी शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रांगीचे माध्यमिक मुख्याध्यापक अजय आखाडे यांनी केले. संचालन प्राथामिक शिक्षिका प्रतिभा बनाईत तर आभार मध्यामिक शिक्षक एम. एम. कुनघाडकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी. जी. सोमनकर, धनंजय वाणी, किशोर येळणे, अनिल कुरुडकर, अतुल चौके, दीक्षा वंजारी, सुधीर शेंडे, सतीश पवार, सुभाष लांडे, राजेशकर कराडे, अमित मेश्राम, विनायक क्षीरसागर, अनिल सहारे, ज्ञानेश्वर घुटके, दीपक भोयर, सुधीर झंजाळ, विनोद चलाख, माणिक मैंद, प्रमिला दहागावकर, महेश बोरेवार आदींसह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास क्रीडा शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.