कालिनगर व विजयनगर येथे शिवसेना शाखेची स्थापना

143

– शेकडो युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत केला जाहीर प्रवेश

मुलचेरा : तालुक्यातील कालिनार आणि विजयनगर या गावात ५ नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख रियाजभाई शेख यांच्या हस्ते गावाच्या प्रवेश दारासमोरील शिवसेना फलकाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपजिल्हा प्रमुख बिरजू गेडाम, तालुका प्रमुख गौरव बाला, शहर प्रमुख दीपक बिस्वास, युवती सेना जिल्हा अधिकारी तूर्जाताई तलांडी, युवती सेना उपजिल्हा अधिकारी अंकिता कन्नाके, माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेची स्थापना झाली. लगेच कालीनगर आणि विजयनगर गावात फटाके फोडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व प्रथम सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, जिल्हा प्रमुख रियाजभाई शेख, तालुका प्रमुख गौरव बाला यांनी शेकडो युवकांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करून घेतले. या प्रवेश कार्यक्रमात जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन प्रवेश केलेल्या युवकांना आपल्या मार्गदर्शनात अहेरी विधानसभा क्षेत्रात ना. उध्दव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहिर प्रवेश करीत आहे. आज आपल्या राज्याला एक प्रामाणिक इमानदार आणि शांत स्वभावाचे मुख्यमंत्री प्राप्त झाले आहे. याचाच परिणाम आपल्या भारत देशात उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. आम्हा सर्वांना गर्व आहे आणि येत्या काळात अहेरी विधानसभा क्षेत्रात नक्कीच शिवसेना एक हाती सत्ता काबीज करणार असल्याचे रियाज शेख यांनी सांगितले. आपल्या गडचिरोली जिल्ह्याला गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी विधानसभा क्षेत्र नाही गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटन बांधणीचा कार्य जोमात सुरू आहे. मागील चार वर्षांंपासून किशोर पोतदार यांनी रात्रंदिवस एक करून १५ – १५ दिवस ठिया टाकून पक्ष संघटन मजबूत केली आहे. आज जिल्ह्यात त्यांची महिनतीचे फळ पूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचा डंका वाजून राहिला, असे रियाज शेख यांनी मत व्यक्त केले. तसेच किशोर पोतदार यांनी पक्ष संघटन वाढीसाठी अनेक प्रकारचे आरोप – प्रत्यारोपाचे सामना करीत गडचिरोली सारख्या अती दुर्गम नक्षलग्रस्त भागात आपले जीवाची बाजी लावून, कुणालाही न घाबरता एक निष्ठेने शिवसेना पक्ष प्रमुख, उध्दव ठाकरे यांचे आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदाला न्याय देत केवळ आणि केवळ शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिक कार्य केले. मुंबईवरून येऊन मुक्कामी पक्षाचे काम करणे इतके सोपे नाही. पण किशोर पोतदार यांनी करून दाखविले, असेही रियाज शेख जिल्हा प्रमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी सह संपर्क प्रमुख विलास कोडापे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले, एकेकाळी मुलचेरा येथे शिवसेनेचा बोलबाला होता आज पुन्हा तालुक्यात गौरव बाला तालुका प्रमुख झाल्यापासून पक्षाचे कार्यात वाढ होत आहे. शिवसेना कमर कसलेली आहे. येत्या नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकतीने उतरणार आणि विजयी प्राप्त करणार आणि आपण सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि नवीन प्रवेश केलेल्या युवकांना सोबत घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन प्रसार प्रचार करावे, असे आवाहन यावेळी सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप यांनी केली. कार्यक्रमाचे आयोजन तालुका प्रमुख गौरव बाला प्रास्ताविक भाषणात म्हणाले, गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष संघटन कौशल्य शिस्तबद्धता कार्य सुरू आहे आणि आम्ही पाचही तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक पक्ष संघटन वाढीसाठी कार्य करू असे मत व्यक्त केले. कालीनगर व विजयनगर या गावातील सुशिक्षित आणि समाजसेवक धडाडीचे युवक ब्रबिर हलदार, अमरीत ढाली, अजय रॉय, नेपाल हलदार , सुजित भकतो, प्रभात मंडळ, सुमंत मंडळ, जयचंद शील, रणजित मंडळ, गोविंद मंडळ, संदीप रॉय, अजित, संजय मिस्त्री यांच्यासह शेकडो युवक शिवसेनेत प्रवेश केल्याने मुलचेरा तालुक्यात शिवसेना पक्षाला फायदा होईल, असेही गौरव बाला तालुका प्रमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन दीपक बिस्वास यांनी केले. शेकडो शिवसैनिकांनी उपस्थित राहून सदर जाहिर पक्ष प्रवेश कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले.