स्वस्त धान्य दुकानांमध्ये लवकरात लवकर गव्हाचा पुरवठा करावा : लिलाधर भरडकर

50

– गेल्या तीन महिन्यांंपासून दुकानात गहू आलेलाच नाही

– आठ दिवसात पुरवठा न केल्यास करणार आंदोलन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांंमध्ये मागील तीन महिन्यांंपासून गव्हाचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी राजाचा बैलपोळा सारख्या सणासुदीमध्ये गहू उपलब्ध न झाल्यामुळे गव्हाच्या पोळीविना सण साजरा करण्याची वेळ ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नागरिकांवर आली आहे. गणेश उत्सोवासारखा सण सुरु असताना गरजू लाभार्थ्यांना राशन दुकानातुन गहू मिळत नसल्याने अडचणींंचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आताच्या वाढलेल्या जीएसटीमुळे गहू व अन्य धान्यावरील दरवाढ अवाक्याबाहेर झाल्याने सामान्य नागरीक गहू खरेदी करु शकत नाही. शासनाकडून गव्हाचा अनीयमीत पुरवठा होत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांंना स्वस्त दरातील गव्हांपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्याने अतिवृष्टीसारखी परिस्थिती नीर्माण झाली आणि सामान्य कुटुंबातील साठवून ठेवलेला अन्नधान्य पाउसामुळे खराब झालेला आहे. तरी गडचिरोली सारख्या जिल्ह्यात अधिकारी व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. तसेच माहे जुन महिन्याचे पैसेवाला कंट्रोलचे धान्य आणि फ्री धान्य वाटप करायचे आदेश जिल्हापुरवठा अधिकारी यांनी लवकरात लवकर द्यावे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व राशन दुकानाचे लाभार्थ्यांंना मोफत धान्यांचे कमीशन लवकर अदा करावे. तरी आठ दिवसांंच्या आत राशन दुकानात स्वस्त दरातील गव्हाचा पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा, अन्यथा जिल्हा अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्याता येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, तसेच युवक विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, तालुका अध्यक्ष श्रीधर येरावार यांनी दिला आहे.