खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते फुटबॉल प्रतियोगिताचे उद्घाटन

73

– जय दुर्गा कल्चरल स्पोर्ट्स असोसिएशन गौरीपूर येथे भव्य फुटबॉल प्रतियोगिताचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर येथे फुटबॉल प्रतियोगिता कार्यक्रमाचे उद्घाटन रिबिन कापून या क्षेत्राचे खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खा. अशोकजी नेते यांनी गौरीपूर या गावी ही परंपरा ४० वर्षांंपासून चालू आहे. ही परंपरा टिकवणे गावावर अवलंबून आहे. अशा या प्रतियोगितेमुळे युवकांना उत्साह, आनंद मिळतो. खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते. अशा फुटबॉल प्रतियोगिताचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी खा. अशोकजी नेते यांनी केले. फुटबॉल प्रतियोगिता कार्यक्रमाची सुरुवात खा. अशोकजी नेते यांनी रिबिन कापुन, श्रीफळ फोडून, राष्ट्रगीताने सुरू करण्यात आले.

यामध्ये प्रथम पुरस्कार खा. अशोकजी नेते व सहकारी यांच्याकडून ४०००१/- द्वितीय पुरस्कार डॉ. तामदेव दुधबळे माजी जि. प. उपाध्यक्ष यांच्याकडून २५००१/- व तृतीय पुरस्कार मुजुमदारताई व हदय बाला यांच्याकडून १०००१/- रूपये अशाप्रकारे ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन करण्यात येते.
त्यावेळी खा. अशोकजी नेते.गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस. टी. मोर्चा, स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य, आशिषजी पिपरे नगरसेवक तथा जिल्हा महामंत्री ओबिसी मोर्चा, शिल्पा रॉय जि. प. सदस्या, आशिष मुखर्जी सरपंच, महानंद हलदार उपसरपंच, रमेश अधिकारी सोशल मीडिया संयोजक, रेवनाथजी कुसराम माजी पं. स. सदस्य तथा एस. टी. मोर्चा संघटन, तरून गाईन तसेच अनेक गावातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.