20 ऑगस्ट रोजी खासदार, आमदार यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

57

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सतत पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मेडीगट्टा व गोसेखुर्द येथून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार – तीबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या करण्यास सुरुवात केली. अशी परिस्थिती असताना सुद्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार राज्य शासनानाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजुनही आर्थिक मदत करण्यासाठी आवाज उठवला नाही. यावरून जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत आहेत की काय ? हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. परंतु जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही भरीव निधीची मदत करण्यात आलेली नाही,. अश्या निद्रा अवस्थेत असलेल्या सरकारला व स्थानिक आमदार, खासदारांना जागे करण्यासाठी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरिता जिल्हा काँग्रेसच्या वतीने 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी सर्व सेल अध्यक्ष, काँग्रेस कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधवाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.