खासदार अशोकजी नेते यांनी केली सावली तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची व पूरपरिस्थिची पाहणी

112

– वैनगंगेच्या पाणीपात्रात वाढ झाल्याने अनेक ठिकाणची शेती पाण्याच्या वेढ्यात

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : गोसीखुर्द कालव्यात भरपुर प्रमाणात जलसाठा झाल्याने,अतिरीक्त पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आला..त्यातच वैनगंगेच्या नदीलगतच्या गावांना पुराचा फटका बसला. अनेक शेती पाण्याखाली सापडलेली आहे. अनेक घरांची पडझड व घरांमध्ये पूर आला. खासदार अशोकजी नेते यांनी करोली, गेवरा, बोरमाळा, विहीरगाव व निफंद्रा या गावांना भेटी देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.

पुरामुळे अनेक घरांची पडझड झाल्याने, कुटुंब प्रमुखाला सावरण्याचा प्रयत्न केला. खां. अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना पुरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अश्या सुचना दिल्या. यावेळी उपस्थित खासदार अशोकजी नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा अविनाश पाल, मोहन चन्नावार, लोहंबरे सरपंच करोली, डाॅ. धारणे, नवघडे सरपंच निफंद्रा, नानु उंदिरवाडे उपसरपंच निफंद्रा तथा गावातील नागरीक उपस्थित होते.