– १४ ऑगस्ट फाळणी दिन अर्थात विभाजन विभिषिका स्मृतीदिनाचे औचित्य
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : १४ ऑगस्ट फाळणी दिन अर्थात विभाजन विभिषिका स्मृती दिनानिमित्ताने भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गडचिरोली शहरातील मुख्य मार्गावरून हातात तिरंगा झेंडा घेवुन मूक मिरवणूक/यात्रा निघणार आहे.
तरी भाजपा युवा मोर्चा, महिला आघाडी, सर्व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सहभाग घेवुन विभाजन विभिषिका स्मृती दिन साजरा करण्यासाठी स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे सायंकाळी ५ वाजता एकत्रित यावे, असे आवाहन भाजपा जिल्हा संयोजक तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व सहसंयोजक तथा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांनी केले आहे.