कुरूड येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत भव्य आरोग्य व मोफत औषध उपचार शिबिर संपन्न

219

– मधुकरजी भांडेकर मित्र परिवार व स्पंदन फाऊंडेशन गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम

– शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मधुकरजी भांडेकर मित्र परिवार व स्पंदन फाऊंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ७ ऑगस्ट रोजी चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत भव्य आरोग्य व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात मोफत औषधोपचार, मोफत शुगर, बी. पी. तपासणी, जनरल तपासणी, बालरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दातांचे विकार, मुळव्याध आदींची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

याप्रसंगी जनरल फिजिशियन डॉ. मिलिंद नरोटे, दंतरोग तज्ञ डॉ. धम्मदीप बोदेले, मुळव्याध तज्ञ डॉ. सौरभ नागुलवार, बालरोग तज्ञ डॉ. निखील चव्हाण, जनरल फिजिशियन डॉ. पंकज कामेलवार, शिबिर संयोजक तथा भाजयुमो गडचिरोली जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, कुरुड ग्रामपंचायतचे सरपंच विनोद मडावी, उपसरपंच बाबुरावजी शेंडे, माजी जि. प. सदस्य पूर्णचंद्र रायसिडाम, माजी पं. स. सभापती किसनरावजी शेट्टे, माजी पं. स. सभापती किरतीमंतराव रायसिडाम, माजी उपसरपंच रमेशजी सातपुते, ग्रा. पं. सदस्य निलकंठ सातपुते, शरद रायसिडाम, गिताताई मडावी, कुंदाताई चलाख, अल्काताई मडावी, वर्षाताई मुरकुटे, दीपिकाताई ऊईके, तानाजी धोडरे, ज्ञानेश्वर सातपुते, वासुदेव सातपुते, किसनजी भांडेकर, कैलासजी धोडरे, रमेशजी सातपुते, पुरुषोत्तमजी बावणे, तेजराव सातपुते, सुरेशजी नैताम, रमेशजी कोहळे, भाविक सोनटक्के, ईश्वर चलाख, निलकंठ चलाख आदी उपस्थित होते.