रेव्हन्यू कॉलनी, गणेशनगर परिसरातील समस्या निकाली काढा

90

– युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर यांची मागणी

 – सततच्या पावसामुळे झाले जनजीवन विस्कळीत

– नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 15 दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे रेव्हन्यू कॉलनी, अयोध्या नगर, अनमोल नगर, गणेश नगर, पंचवटी नगर येथे मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आणि बॉटल वाहून येऊन ते नागरिकांच्या घरासमोर पडून आहेत. तलावाचा फाल निघाल्यामुळे तलावातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरासमोर वाहत आलेली आहे. त्यामुळे ती वनस्पती तिथेच ठेवल्यास ती त्या ठिकाणी पसरू शकते. त्यामुळे तातडीने ती वनस्पती उचलणे गरजेचे आहे. गणेश नगरमध्ये नाल्याच्या पाण्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील पूर्ण पाणी गोकूलनगर येथील तलावात जातो. आता तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्या तलावाचा पाणी नाल्याच्या माध्यमातून गणेश नगर परिसरात येतो आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावरून 3 ते 4 फूट पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडत येत नाही. त्यामुळे त्या नाल्याच्या योग्य तो बंदोबस्त करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या विहिरीमध्ये दूषित पाणी गेल्यामुळे तुरटी आणि ब्लिचिंग पावडर टाकून देण्यात यावे. परिसरातील ओपन प्लेस ओस पडले आहेत. त्यांचे कुठेही सौंदर्यकरणं करण्यात आलेले नाही. सर्व ओपनप्लेसचे लवकरात लवकर सौंदर्यकरण करून देण्यात यावे जेणेकरून ओपन प्लेसच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही. नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाही. यासाठी लवकरात लवकर परिसराची डासनाशक फवारणी करून देण्यात यावी. या परिसरात मागील 10 वर्षांपासून रस्ते, नाली नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

तरी मुख्याधिकारी यांनी परिसरातील समस्या तत्काळ निकाली काढून देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी उपस्थित विश्वनाथ तलांडे, शरद गिरेपुंजे, साई सिल्लमवार, प्रवीण खडसे, मनीषा ढवळे, शामराव सिल्लमवार, प्रवीण चकिनारपवार, रामन्ना गडप्पा, अमित तलांडे, रुपेश टिकले उपस्थित होते.