पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

70

– वृंदावन येथील श्रीकृष्ण मंदिरात भोग चढवून किरण पांडव यांच्या हस्ते दहा हजार मिठाई बॉक्सचे वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
9 फेब्रुवारी रोजी ना. एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने वृंदावन येथील श्रीकृष्ण मंदिरात भोग चढवून किरण पांडव यांच्या हस्ते दहा हजार मिठाई बॉक्सचे ठाण्यात वितरण करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्या कामाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा समन्वयक किरण पांडव अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
ना. एकनाथजी शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यापासून जिल्हा विकासाच्या पथावर आहे. जिल्ह्याातील अनेक तालुक्यात विकास कामे प्रगतिपथावर आहे. तसेच जिल्ह्यातील मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसनेचा झंडा फडकला आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्हयाचे जिल्हा समन्वयकपदी किरण पांडव यांची नियुक्ती केली. जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्या नेतृत्वात व जिल्ह्यातील शिवसेैनिकांच्या नियोजनबध्द व्यवस्थापनेमुळे मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसेनेच्या 6 जागा निवडून आल्या. गडचिरोली जिल्ह्याच्या विकास कामांकरिता किरण पांडव नेहमीच तत्पर असून अधिकाअधिक विकास कामे ना. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात करण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी ना. एकनाथजी शिंदे यांनी जिल्हा समन्वयक किरण पांडव यांच्या कामाला पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.