एका मृत्यूसह गडचिरोली जिल्हयात 88 कोरोनाबाधित, तर 30 कोरोनामुक्त

72

विदर्भ क्रांती न्यूज

 गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 800 कोरोना तपासण्यांपैकी 88 नवीन कोरोना बाधित झाले असून 30 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आतापर्यंत बाधित 31503 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30251 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 502 झाली आहे. एका मृत्यूमध्ये गोंदिया जिल्हयातील सडक अर्जूनी तालुक्यातील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तिला सिकलसेल आजार होता. आतापर्यंत जिल्हयात एकुण 749 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.03 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.59 टक्के तर मृत्यू दर 2.38 टक्के झाला आहे. आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 47, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी तालुक्यातील 2, भामरागड तालुक्यातील 4, चामोर्शी तालुक्यातील 0, धानोरा तालुक्यातील 3, एटापल्ली तालुक्यातील 3, मुलचेरा तालुक्यातील 0, सिरोंचा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 5 आणि वडसा तालुक्यातील 9 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 30 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 21, भामरागड तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 7,आणि मुलचेरा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.