नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते खुल्या जागेच्या सौन्दर्यीकरण बांधकामाचे भूमिपूजन

103

– स्नेहनगर (इंदिरानगर) प्रभाग क्र. ३ च्या सौन्दर्यीकरण व विकास कामावर भर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.३ मधील श्री नंदनवार यांच्या घराजवळील खुल्या जागेचे सौन्दर्यीकरण बांधकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर बांधकामाची अंदाजित रक्कम ७ लक्ष एवढी आहे.
प्रभाग क्र. ३ मध्ये दलितेत्तर वस्ती सुधार योजना योजना अंतर्गत १.३१ कोटींचे, नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत १.३७ कोटींचे सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली व विविध विकास कामे तसेच एक कोटी रुपयांचे खुल्या जागेचे सौन्दर्यीकरण झालेले आहेत.
भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, चंद्रकांत बांबोळे, हरिभाऊ बोलुवार, शंकरराव बंडावार, रामदास झंझाळ, आरती बोकळे, प्रेमिला बोलुवार, नेहा बोकडे, लता नंदनवार, ताराबाई झंझाळ, मंगला सोमनकर, मंजुषा झंझाळ, स्नेहल नंदनवार, शीला कांबळे यांच्यासह वार्डातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.