राजमाता जिजाऊंचे आदर्श तर स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांसाठी प्रेरक : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

109

– नगर परिषद येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या युग प्रवर्तक शिवाजी महाराज व प्रतापशाली संभाजी महाराज ह्या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या विश्ववंध्य राजमाता जिजाऊंचे आदर्श सर्वांनी आत्मसात करावे तर स्वामी विवेकानंद म्हणजे एक तेजाचे भंडार होते. ते खूप तेजस्वी होते. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरा अध्यात्म समजवून सांगितले. त्यांचे विचार आजही तरुणांसाठी खूपच प्रेरक आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना केले.
स्थानिक नगर परिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी नगराध्यक्ष बोलत होत्या. सर्वप्रथम नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेविका वैष्णवी नैताम, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, मुख्याधिकारी विशाल वाघ, नगरपंचायत धानोराचे मुख्याधिकारी बेंबरे साहेब, कार्यालयीन अधीक्षक बुक्कावार, आरोग्य विभाग प्रमुख अनिल गोवर्धन, शिक्षण विभाग प्रमुख बंडू ताकसांडे, गणेश नाईक, गजभिये, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, वासेकर, पु्न्नेप्रेडीवार, रामटेके, पठाण, धनगुण व नगर परिषद येथील कर्मचारी उपस्थित होते.