माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बोरी-निमनवाडा येथे शेकडो माता- भगिनींना वस्त्रदान

110

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे कार्य, त्यांची शिकवण, गोरगरीबांच्या कल्याणासाठी असलेली तळमळ, सेवाभाववृत्ती या गुणांचा आदर्श जोपासून आजही अनेक शिवसैनिक कार्य करीत आहेत. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना मायेची ऊब दिली. माँ साहेबांचा वसा जोपासून शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने माँ साहेब मीणाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दुर्गम भागातील बोरी – निमनवाडा येथे वस्त्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी माता – भगिनींना वस्त्रदान करण्यात आले. शिवसेनेच्या या सेवाभावी कार्यामुळे शेकडो माता भगिनींचे चेहरे आनंदाने फुलले.
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, शिवसेनेने समाजकारणाला प्रथम प्राधान्य दिले आहे. गोरगरीब, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या कल्याणासाठी शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केली. माँसाहेब मीनाताई ठाकरे या मा. बाळासाहेबांच्या आधारवड होत्या. त्यांनी आपल्या शिवसैनिकांना नेहमी प्रेमाची शिकवण दिली. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपल्या तळागाळातील शिवसैनिकांसह गोरगरीबांना मुलभूत सुविधांबरोबच आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक लक्ष दिले. माँसाहेबांच्या सेवाभावी कार्यांचा आदर्श जोपासून त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून माता – भगिनींना वस्त्रदानाचा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला सेवेचि संधी मिळाली.जनसेवेचे कार्य ही शिवसेनाच करून शकते. या भागातील कोणत्याही समस्या असल्यास त्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबध्द असून जनतेच्या हितासाठी शिवसेना सदैव पाठीशी राहिल, असे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना विलास कोडापे म्हणाले, शिवसेना ही जनतेच्या हितासाठी लढणारी आहे. शिवसेनेच्या प्रयत्नामुळेच अनेक समस्या मार्गी लागतात. शिवसेनेने अनेक आंदोलन उभारून जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. समाजकार्यात शिवसेना अग्रस्थानी असून माँसाहेबांच्या शिकवणीमुळेच शिवसैनिकांना समाजसेवेचे बळ मिळाले आहे. शिवसेना हि जनतेच्या हितासाठी लढणारी सेना आहे, असेही कोडापे म्हणाले. शिवसेनेने नेहमीच समजकार्याला प्राधान्य दिले आहे. कुठल्याही निवडणुका नसताना संक्रांतीच्या पूर्वसंध्येला वस्त्रदानाचा कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले आहे. असे सामाजिक कार्य केवळ शिवसेनेचा करू शकते, असे भावउद्धगार अनेक माता- भगिनींंनी यावेळी काढले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, यांच्यासह संपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, अरुण बरपात्रे, राजू जवाड़े, पांडुरंग दजगये, यशवंत लकुड़वाहे, हरबाजी दजगये, रामदास भहयाल, विलास दाजगये, किशोर दाजगये, प्रभुजी लकुड़वाहे, मुर्लिजी दाजगये,यशवंत कुडमेथे,उद्धवजी दाजगये, हरिदास हमरापुरे, लालाजी भहयाळ, हेमंत बाहयल, लालाजी लकुड़वाहे, राहुल सोरते, संदीप अलबंनकर, संदीप भुरसे,अमूर्त वासेकर, तुलशिराम जुमनाके, प्रशांत ठाकरे, सूरज आकरे, राजू जुवारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक तसेच गावकारी उपस्थित होते.