स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करण्याऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

115

– नगर परिषद येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आद्य शिक्षिका, स्री शिक्षणाच्या प्रणेेत्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी व क्रांतिकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाचे मोलाचे कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.
स्थानिक नगर परिषद येथील कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना नगराध्यक्ष बोलत होत्या.
कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे, वैष्णवीताई नैताम, अल्काताई पोहनकर नगरसेवक नितीन उंदिरवाडे, विलास नैताम, देवाजी लाटकर, बुक्कावार, अनिल गोवर्धन, टाकसांडे, स्नेहल सेन्द्रे, अभियंता मैंद, अंकुश भालेराव, मारोतीवार, वासेकर, गणेश नाईक, गणेश ठाकरे, मडावी, शोभा भोयर तसेच नगर परिषद येथील कर्मचारी उपस्थित होते.