गडचिरोली-चिमूर लोकसभेची उमेदवारी भाजपाचे अशोक नेते यांनाच द्या

60

– भाजपा पदाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील २० ते २५ वर्षापासून गडचिरोलीमध्ये भारतीय जनता पार्टीने विजय संपादन करून आपला बालेकिल्ला बनवलेला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भरपूर मताधिक्याने भारतीय जनता पार्टीने विजय खेचून आणलेला आहे. परिणामी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा करावा, अशीही मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

या पत्रकार परिषदेला भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे, किसान आघाडीचे रमेश भुरसे, विनोद अतकलमवार, जिल्हा सचिव रंजीता कोडाप, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शाम कृपपविर, प्रा. अनिल बारसागडे, धानोरा तालुका अध्यक्ष लता पुंगाटी, निखिल गादेवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, डॉ. भारत खटी, मोहन मते यांच्यासह तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.