देशात पुन्हा एकदा मोदी सरकारचा मातृशक्तीचा संकल्प

49

– नारीशक्तीवंदन कार्यक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली शहरातील मातृशक्तीना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले संबोधित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे सन्माननीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी काल पश्चिम बंगालमधून मातृशक्तींना संबोधित केले. गडचिरोली शहरामध्ये भाजपा जिल्हा महामंत्री, माजी नगराध्यक्ष तथा महिला आघाडी लोकसभा संयोजिका योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे नारी शक्ती वंदन लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोली शहरातील शेकडो बचतगट, एनजिओ महिलांनी नारी शक्तीवंदन मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या लाईव्ह कार्यक्रमाला उपस्थित राहून ‘अब की बार फिर मोदि सरकार’ ४०० पार असा जयघोष करीत देशात पुन्हा एकदा मोदी सरकारचं! येणार असा संकल्प केला. कार्यक्रमाला लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान आघाडी प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, गोवर्धनजी चव्हाण, केशवजी निंबोळ, विवेकजी बैस, प्रा. अरुण उराडे, प्रतिभाताई चौधरी, कविताताई उरकुडे, त्रिशाताई डोईजड, पुष्पांताई करकाड़े, वर्षाताई शेडमाके, वैष्णवीताई नैताम, प्रा. अर्चनाताई चन्नावार, निताताई उंदिरवाडे, पल्लविताई बारापात्रे, अर्चनाताई निंबोळ, ज्योतीताई बागडे, रश्मीताई बानमारे, पुनमताई हेमके, भावनाताई हजारे, स्वाती चंदनखेडे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच विविध बचत गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.