मनेराजाराम धान खरेदी केंद्राची मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे करणार तक्रार

30

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अतिदुर्गम अश्या भामरागड तालुक्यातील मनेराजाराम अविका धान खरेदी केंद्राची तक्रार आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे करणार असल्याचे जनकल्याण समाजोनती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटिकोंडावार यांनी परिपत्रकातून म्हटले आहे

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे भामरागड तालुक्यातील मननेराजाराम आदिवासी विकास मंडळाच्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची सर्रार लूट होत असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून ताटिकोंडावार यांनी मनेराजाराम गावाला भेट दिली व शेताऱ्यानी सविस्तर धान खरेदी केंद्रावर आमची फसवणूक होते, असे सांगितल्यानंतर सरपंच गाव पाटील व शेताऱ्यासमक्ष काही भरलेल्या धानाच्या पोत्यांचे (गोणी) धान खरेदी केंद्राच्या काट्यावर वजन केले. त्यावेळेस प्रत्येक पोत्यात (गोणी) 42 किलो काही जागी 42 250 अशे आढळले. शासनाच्या नियमानुसार 40,600 घ्यायचे असते जवळ जवळ शेतकऱ्याला 2 ते 2,50 की धान म्हणजे क्विंटल मागे 4 ते 5 की जास्तिची लूट होते. त्याला अनुसरून ताटिकोंडावार यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दिल्यानंतर वृत्तपत्राने दखल घेत सर्व घोड हा वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली तरीही आजपर्यंत कारवाही झाली नाही.

दिनांक 22 /2/2024 रोजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आलापल्ली येणार असून त्यांच्याकडे या बाबीची तक्रार करणार आहे, असे ताटिकोंडावार यांनी परिपत्रकात म्हटले आहे.