राजाराम ते कमलापूर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत डांबरीकरण रस्त्याची दयनीय अवस्था

54

– सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा आरोप

– पुनःच्च डांबरीकरण करण्याची सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील राजाराम येथील उतरेकडील जाण्याचा मार्ग थेट कमलापूर, रेपणपल्ली ते सिरोंचा जाण्याचा मार्ग असून या रस्त्यावर गेल्या दोन वर्षापूर्वी दावडुग करण्यात आले. परंतु काही दिवसातच रस्त्याचे वाट लागून मोठमोठे भोकदाड व खड्डे पडलेले आहेत. मात्र या खड्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष करीत आहेत का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

राजाराम ते कमलापूर अवघ्या 10 किलोमीटरचा अंतर आहे. परंतु या मार्गांवर तारेची कसरत करावा लागत असतो. मुख्यत: म्हणजे कमलापूर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून एकादी गरोदर माता रस्त्यातच डिलिव्हरी होण्याची दाठ शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर लहान-लहान गिट्टी बाहेर निघून आहे. अपघात
होण्याची धाट शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यावर डांबरीकरण करण्यात येते की काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केली आहे.