– मुक्तेश्वरजी काटवे व कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन केली साफसफाई
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशभरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी गडचिरोली शहरातील हनुमान वार्ड व फुले वार्डातील हनुमान मंदिरात भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा गडचिरोली नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती व तेली समाजाचे नेते मुक्तेश्वरजी काटवे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, तेली समाजातील पदाधिकारी व वार्डातील कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः स्वच्छता करून देशभरातील मंदिर स्वच्छतेच्या दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून १९ जानेवारी रोजी शहरातील हनुमान वार्ड व हनुमान वार्ड येथील हनुमान मंदिराच्या आवारात भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे व कार्याकार्यानी आपल्या हातात झाडू व सफाईचा पोचा घेऊन साफसफाई करून मंदिर स्वच्छ केले. मंदिर स्वच्छ झाल्यानंतर ‘अब की बार, फिर मोदी सरकार २०२४’ असा भाजपा सरकारच्या विजयाचा संकल्प केला.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वरजी काटवे यांच्यासह हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष मनोज भांडेकर, कैलास भांडेकर, महादेव बोबाटे, सोनू महडोरे, श्रावण डोंगरवार, प्रभाकर कोकोडे, नकटूभाऊ, घनश्याम पाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







