विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील १०६ विध्यार्थीना विषबाधा झाली. घटनेची माहिती कळताच माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भेट दिली. भेटीदरम्यान स्वतः डॉ. उसेंडी यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करत त्यांची विचारपूस केली. त्यावेळी विद्यार्थ्यांची घटनेची माहिती दिली.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास आलूकोबीची भाजी, वरण भात असे जेवण केल्यानंतर काही वेळाने मळमळ, उलटी, हगवण सुरू झाले. नंतर शिक्षकांना कळविण्यात आले. शिक्षकांनी धानोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. सर्व विद्यार्थ्यांची तब्बेत धोक्याबाहेर आहे असे उपस्थित डॉक्टरांनी माहिती दिली. भोजनाचे कंत्राट कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदारांनी ताजे भाजीपाले व अन्नधान्य पोहचवावे. सोबतच आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी अन्नधान्य, जेवण तपासून विध्यार्थ्यांना द्यावे. सदर घटनेची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केली आहे.
यावेळी उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे, फीझिसीएन डॉ. मनीष मेश्राम, काँग्रेस कमिटी माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, डॉ. विनय उसेंडी, गडचिरोली विधानसभा समन्वयक पंकज खोबे, दत्तात्रय करंगामी, सुहास करंगामी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.







