बिरसा मुंडा यांनी संघर्षासोबतच केले मोलाचे समाजकार्य : डॉ. नामदेव किरसान

84

– जोशीटोला येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी जमीनदार, मालगुजार व इंग्रजांशी संघर्ष (उलगुलान) करीत असतानाच समाज सुधारणेचे सुद्धा मोलाचे कार्य केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी केले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील जोशीटोला (तिरखेडी) ता. सालेकसा जि. गोंदिया येथे 21 नोव्हेंबर 2023 रोजी क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सहसराम कोरोटे, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई मडावी, सरपंचा प्रियाताई शरणागत, माजी गटशिक्षणाधिकारी वाय. सी. भोयर, बबलूभाऊ फुंडे, राजेश भोयर, रमण सलामे, जयश्रीताई भोयर, अंजनाताई सलामे, मनोजभाऊ शरणागत, रेखाताई टेकाम, ममताताई मोहबे, मालनबाई धुर्वे, दिलीपजी बिसेन, सदाशिव कोठेवर, राजेंद्र बिसेन, कृष्णाजी पटले, निकेश गावड व गावकरी उपस्थित होते.