Home गडचिरोली गडचिरोली विधानसभा भाजपा बूथ पालकांचा उद्या चामोर्शी येथे मेळावा

गडचिरोली विधानसभा भाजपा बूथ पालकांचा उद्या चामोर्शी येथे मेळावा

174

– बुथ पालकांना उपस्थित राहण्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बूथ पालकांचा मेळावा मंगळवार, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता चामोर्शी येथील तेली समाजाच्या सभागृहात होणार आहे. या मेळाव्याला बूथ पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.

या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी बाळाभाऊ अंजनकर, खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा संयोजक किसनजी नागदेवे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्यासह जिल्ह्याचे महामंत्री मार्गदर्शन करणार आहेत.

error: Content is protected !!