विदर्भ क्रांती न्यूज
गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील शिवणी येथे 5 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव इशुलालजी भालेकर व प्रदेश प्रतिनिधी संपतजी सोनी यांच्यासह तेथील सरपंच संतोष सतीशहारे, माजी सरपंच भाऊदासजी भिवगडे, वरिष्ठ कार्यकर्ता शंकरजी भुते, माजी सदस्य अशोकजी भावे, राधेश्यामजी हत्तीमारे, लखनजी हत्तीमारे, संदीपजी उके व स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या नागरिक त्रस्त झाले आहेत. चुकीच्या व अन्यायकारक निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचे फार मोठे नुकसान होत आहे. हा अन्याय थांबविण्यासाठी सत्ता परिवर्तन करणे आवश्यक असल्याचे डॉ. नामदेव किरसान यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.