विदर्भ क्रांती न्यूज
गोंदिया : 31 ऑक्टोबर 2023 रोजी गोंदिया येथे संयुक्त युवा छात्र तथा बेरोजगार संघ द्वारा कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. खाजगीकरण कंत्राटीकरणाच्या विरोधात आयोजित या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान, शिक्षक आमदार सुधाकर अडवले, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप बनसोड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव अमर वराडे, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अशोक गुप्ता, जिल्हा परिषद सदस्या सालेकसा विमल ताई कटरे, जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव राजू काळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.







