Home गडचिरोली व्येंकटपूर बससेवा सुरू करा : अजय कंकडालवार

व्येंकटपूर बससेवा सुरू करा : अजय कंकडालवार

149

– अहेरी आगार व्यवस्थापकांची घेतली भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या व्येंकटपूर, कर्णेली, लंकाचेन आदी गावातील नागरिकांना बससेवा नसल्याने अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडलवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे भेट घेवून समस्या सांगितली. माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी आगार व्यवस्थापकांची भेट घेवून सदर बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिसद सदस्य अजय नैताम, ग्रामपंचायत सदस्य तथा अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे, मुत्ता पोरतेट, श्रीनिवास आत्राम, वासुदेव आत्राम, रवी चौधरी, नामदेव मडावी, लक्ष्मण लेंडगुरे, श्रीनिवास ठाकरे, मलया दोंतुलवार, राकेश दोंतुलवार, शंकर मडावी, शंकर कोंटरगे, पोचम चाटरे, येंकट्टी इष्टाम, बालाजी ठाकरे, तिरुपती आत्राम, लक्ष्मण आत्राम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!