नऊ वर्षात कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात यश : आमदार डॉ. देवराव होळी

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील ९ वर्षांच्या कालावधीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण सतत प्रयत्नशील असून केंद्र व राज्य सरकारकडून विकास कामासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून आणण्यात आपल्याला यश मिळाले असल्याची माहिती आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गडचिरोली क्षेत्रातील ४९ हजारांवर शेतकऱ्यांच्या ३५ हजार २६१ हेक्टर जमिनी वर्ग १ करून शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यात आली.  ५१०५ शेततळे, २०१ बोड्या, १३५० विहिरी आणि जलयुक्त शिवार योजनेतून १९७ गावांमध्ये ४ हजार ४५२ शेतकऱ्यांची ६७ कोटींची कामे आपल्या प्रयत्नाने पूर्ण झाली आहेत. शिवाय रस्ते, पूल, क्रीडांगण, पाणीपुरवठा योजना आदी कामे मंजूर झाली असून महिला व बाल रुग्णालय आवश्यक पदभरती व निधी, 100 खाटांच्या नवीन रुग्णालय बांधकाम आपल्या प्रयन्त्नाने सुरू असल्याची माहिती यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश सदस्य रवींद्र ओल्लालवार, महासचिव तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, पं. स. माजी उपसभापती विलास दशमुखे, तालुका अध्यक्ष विलास पा. भांडेकर, शहर अध्यक्ष तथा माजी नगर परिषद सभापती मुक्तेश्वर काटवे आदी उपस्थित होते.