आलापल्ली एफडीसीएम ऑफिसच्या रस्त्याची दुरावस्था

35

– प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा मानवाधिकार संघटनेचा आरोप

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, २३ ऑगस्ट : अहेरी तालुक्यातील आलापल्ली एफडीसीएम रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून सुद्धा संबंधित अधिकारी मात्र लक्ष देत नसल्याचा आरोप राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर यांनी आरोप केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून आलापल्लीची ओळख आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री महोदय असून सुद्धा लक्ष न देत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस असून सुद्धा गडचिरोली जिल्ह्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष देऊन गडचिरोली जिह्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिका संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.