भाजप महिला आघाडीच्या वतीने चामोर्शीत घर-घर चलो महाजनसंपर्क अभियान

32

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २३ ऑगस्ट : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर व गुंडापल्ली या ठिकाणी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात घर-घर चलो महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले.

यावेळी नेताजीनगर व गुंडापल्ली येथील नागरिकांच्या घरी जावून त्यांना केंद्रातील मोदी सरकारने ९ वर्षाच्या कालावधीत केलेली चांगली लोकोपयोगी कामे, शासनाचे चांगले निर्णय व विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

याप्रसंगी भाजप महिला आघाडी उपाध्यक्ष अनिता रॉय, शहर महामंत्री रश्मी बानमारे, भाजप कार्यकर्त्या पुष्पाताई करकाड़े, पुनम हेमके, रेभा सरदार, गीता रॉय, रेभा बाला, मिनू बिश्वास, स्वरस्वी मंडल, शारती मंडल, गीता शैलदर तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.