अमृत भारत स्टेशनअंतर्गत वडसा रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचे खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते भूमिपूजन

58

– पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉम्प्रेसिंगद्वारे ५०८ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन

– खासदार अशोकजी ‌नेते यांच्या प्रयत्नांना यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ६ ऑगस्ट : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते, केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री दर्शनाताई यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉम्प्रेसिंगच्या माध्यमातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या देशातील ५०८ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचा शिलान्यास कार्यक्रम आज, 6 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) या रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते आज रविवारी पार पडले.

खासदार अशोकजी ‌नेते यांनी रेल्वे संबंधित सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांच्या प्रयत्नाने गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील वडसा (देसाईगंज) व आमगाव येथील रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन वडसा (देसाईगंज) असून या स्टेशनवरून नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात होते.

अमृत भारत स्टेशन अंतर्गत वडसा (देसाईगंज) या रेल्वे स्टेशनच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते म्हणाले, आपण रेल्वे संबंधित सातत्याने पाठपुरावा करून रखडलेले अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्याबरोबर नव्या बजेटनुसार अमृत भारत स्टेशन स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या वडसा (देसाईगंज) या रेल्वे स्थानकांचा आज पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या द्वारे आभासी पद्धतीने पुनर्विकासचा शिलान्यास संपन्न झाला. अमृत भारत कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी गेल्या ९ वर्षात सातत्याने प्रशंसनीय आणि ऐतिहासिक विकास कामे केली आहेत. अमृत ​​भारत स्थानक योजनेद्वारे रेल्वे विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे आणि स्टेशन पोहोचणे, वेटिंग, हॉल, मोफत वाय-फाय यासारख्या नागरिकांच्या आधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत. वडसा स्टेशनचा पुनर्विकास खर्च: १८.४ कोटी आहे, असे प्रतिपादन खासदार अशोकजी ‌नेते यांनी याप्रसंगी केले.

यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, उपप्रबंधक अशोक सुर्यवंशी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्षा शालुताई दडवंते, पद्मभूषण पुरस्कृत डॉ. परशुराम खुणे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहर अध्यक्ष तथा गडचिरोली नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, ओबीसी प्रदेश सरचिटणीस संगीता रेवतकर, युवती प्रमुख प्रिती शंभरकर, तालुका अध्यक्ष नंदु नाकतोडे, तालुका अध्यक्ष अनिल शेंडे, युवा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, ॲड. उमेश वालदे, उल्हास देशमुख, रवींद्र गोटेफोडे, साकेत भानारकर, वसंता दोनाडकर, प्रमोद झिलपे, ओमकार मडावी तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.