राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

70

– एटापल्लीत काँग्रेसला पडले मोठे खिंडार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ ऑगस्ट : एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील जिवनगट्टा येथील अनेक सक्रिय काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम करीत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत अहेरी येथील रुक्मिणी महालात काल भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. ह्यामुळे एटापल्ली येथे काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

भाजपाचे युवा नेते मोहन नामेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवनगट्टा येथील अनेक सक्रिय काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. सर्वांना भाजपाचा दुपट्टा टाकून मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपा पक्षात प्रवेश केलेले लक्ष्मण मडावी, मनिराम इष्टाम, रविंद्र नरोटे, जिवन कुमरे, महेश सिडाम, अजय मडावी, विशाल भांडेकर, सुरज इष्टाम, सचिन नैताम व इतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी एटापल्ली तथा अहेरी येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.