बोरी येथे दर्गा बांधकामासाठी अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

65

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, 28 जुलै : तालुक्यातील बोरी येथील मोहरम निमित्त नवीन दर्ग्याच्या बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी गावातील नागरिकांना मोठा अडचण बसत होती. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि. प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी बोरी येथील कवळी मोहरम कमिटीचे सदस्यांनी अहेरी येथील अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथे माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना भेट घेऊन अडचणीची माहिती दिली असता अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून दर्ग्याच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करण्यात आली. बोरी येथील होणाऱ्या दर्ग्याच्या बांधकामासाठी आर्थिक मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.

यावेळी कवळी मोहरम कमिटीचे सदस्य श्रीनिवास आलम, अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,किशोर कुमरे,किस्टा आत्राम,रुपेश आत्राम,कपिल सोयाम,नरेश आत्राम,नागेश मडावी,गणेश सिडाम,विनोद सिडाम,शंकर आत्राम,नरेश गड्डमवार,अक्षय मडावी,दीपक आत्राम,उमेश सडमेक,जितेंद्र आत्राम,संदीप आत्राम,विनोद आत्राम,नरेंद्र गर्गम,विनोद रामटेके,प्रकाश दुर्गे,नितीन पुलूरवार,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच बोरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते