कारगील दिनानिमित्त शहिदांना आदरांजली

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 27 जुलै : कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोलीच्या वतीने कारगील चौक गडचिरोली येथे बुधवारी कारगील दिनानिमित्त शहिदांना आदरांजली वाहण्यात आली आणि विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नागरिक, युवक उपस्थित राहून देशभक्त शहीद सैनिकांना आदरांजली दिली. सन १९९९ ला कारगील येथे भारत – पाकिस्तान यांचे युद्ध झाले होते. या युद्धात भारतीय शूरवीर सैनिकांनी प्राणाची बाजी लावून पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात शूरवीर सैनिकांनी बलिदान देशासाठी दिले होते. त्यांची स्मृति कायम राहावी म्हणून कारगील विजय दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

गडचिरोली शहरात मागील २४ वर्षापासून कारगील विजय दिवस नित्यनेमाने कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो. त्यांच्याच पुढाकारने गडचिरोली शहरात कारगील स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक नरेंद्र चन्नावार, सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, दिलीप माणुसमारे, विलास जुवारे, सुनील बावणे, निखिल मंडलवार, विजय लोणार, रुपेश सलामे, महेंद्र मसराम, राजू डोंगरे आदी उपस्थित होते.