– वाढदिसानिमित्त शेकडो शिवसैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिल्या शुभेच्छा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २५ जुलै : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या लढवय्या शिवसैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचे कौतुक केले.
याप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेना निर्माण केली. गेली ५ दशकं मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना जिथे अन्याय असेल तिथे वार करणारी शिवसेना, मराठी अन् हिंदुत्वावर हुंकार काढणारी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. खरी शिवसेना कोणती ही महाराष्ट्रातील समस्त जनतेला माहिती आहे. संघर्षातूनच शिवसेनेचा जन्म झाला. कितीही संकटे आली तरी बाळासाहेबांची मुळ शिवसेना कधीही संपणार नसून शिवसेनेचा इतिहास कोणीही पुसू शकत नाही. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा मा. उध्दवसाहेब ठाकरे यशस्वीरित्या चालवित आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जन्म जनतेच्या कल्याणासाठी झाला आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श जोपासून आपली वाटचाल सुरू आहे. बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून जनतेच्या हक्कासाठी आपला लढा सुरू असून जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणार, असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
कात्रटवार पुढे म्हणाले की, समाजकार्याचा वसा मी अविरत जोपासाला आहे. समाजकार्यातून मिळणारा आनंद मोठा आहे. गरजवंताच्या समस्या सोडवून त्याला न्याय मिळवून दिल्यानंतर मिळणारे समाधान अमुल्य आहे. वाढदिवसाला माझ्या शेकडो शिवसैनिकांनी उपस्थित राहून मला कार्यासाठी बळ दिले असून यापुढे आणखी जोमाने जनकल्याणाचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात वाघांची दहशत असून वाघांनी वर्षभरात अनेक शेतकयांचा बळी घेतला आहे. घरातील कर्ता पुरूष निघून गेल्याने गरीब शेतकरी कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत वाघ्रबळी ठरलेल्या आंबेशिवणी येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. तसेच शेकडो नागरिकांना वस्त्रभेट देऊन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले. त्याचबरोबर मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात ‘झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ असा संदेश देत एक हजार वृक्षांची लागवडी करण्यात आली.
अरविंदभाऊ कात्रटवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, काँग्रेसचे नेते जेसाभाऊ मोटवानी, प्रा. समशेर खॉ पठाण, रजनिकांत मोटघरे, नंदु वाईलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (पवार गट) प्रकाश ताकसांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, विकास प्रधान, नंदुजी चावला, यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ उके, प्रशांत ठाकुर, संदिप आलबनकर, सुरज उईके, दिपक लाडे, अमित बानबले, विलास दासगाये, संदिप भुरसे, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप चनेकार, अंबादास मुनघाटे, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश कांबडी, सुधाकर सावसागडे, राजु जवादे, अरुण बारापात्रे, संजय मेश्राम, दशरथ चापडे, रत्नाकर रंधये, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, अमर निंबोड, अनंत हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सुरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवळूजी धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.