राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी किशोर शंभरकर यांची नियुक्ती

73

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी किशोर शभरकर यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष (दिल्ली) महेश पठेल यांनी प्रमाणपत्र व आयडी कार्ड देऊन सन्मानपूर्वक नियुक्ती केली आहे. याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, द्यानेंद्र बिस्वास, मित्र परिवाराने किशोर शंभरकर यांचे अभिनंदन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत असेल त्यांनी आपली आपबीत निवेदन देऊन कळवावे, असे आवाहन किशोर शंभरकर यांनी पत्रकातून केले आहे.