गडचिरोली येथे नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे जल्लोषात स्वागत

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २२ जुलै : भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा शहराच्या वतीने आज, २२ जुलैला गडचिरोली येथे प्रथमत: आगमनाच्या निमित्ताने नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे इंदिरा गांधी चौक येथे फटाक्याच्या जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, चंद्रपूर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देओजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, महिला आघाडी मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, अनिल तिडके, हर्षल गेडाम, दिपक सातपुते, आशिष कोडापे, विवेक बैस, राजु शेरकी, विजय शेडमाके, दतू माकोडे, राकेश राचमलवार, सोमेश्वर धकाते यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.