सिरोंचा तालुक्यातील अनेक भागात डेंग्यूचे लक्षणे

54

– प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी भाग्यश्रीताई आत्राम यांची धडपड

– विशेष वैद्यकीय पथक सिरोंचा तालुक्यात रवाना

 विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : पावसाळ्याच्या हंगामात रोगराई येण्याची शक्यता अधिक असते सिरोंचा तालुक्यातील नरसय्यापली, पापय्यापल्ली, मुलदिमा, येल्ला, परसेवाड़ा, मोयबिनपेठा, दरसेवाडा, कोत्तूर, कोटापल्ली, बोक्सागुडम आदी गावात डेंग्यूचे शिरकाव झाले असून तसे लक्षणे दिसत असल्याची माहिती मिळताच तत्काळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे व सबंधितांना तत्काळ संपर्क साधुन वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी व निदान करण्यासाठी कळविले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन विशेष वैद्यकीय पथक सिरोंचा तालुक्यातील कित्येक भागात दाखल केले असून वैद्यकीय चम्मू युद्धपातळीवर आरोग्य सेवेचे कार्य सुरु केले आहे व अजुन चमू पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, श्रीनिवास कडार्लावार, नरसय्यापली येथील उपसरपंच लस्मया नलगुंटावार आदिंनी सुद्धा आपल्या स्तरावरुण हालचाली केले आहेत.

डेंग्यूचा बचावासाठी विशेष काळजी घ्यावी

पावसाळ्यात जागोजागी पाणी डबक्यासारखे गोळा असते. त्यामुळे डास व मच्छरांची संख्या वाढते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया सारखे आजार वेगाने पसरतात. मादी एडीज इजिप्ती डासाने चावल्यामुळे डेंग्यूची सुरुवात होते. सुरुवातीला हा ताप सामान्य वाटतो. परंतु वेळेवर जर यावर उपचार सुरु केला नाही किंवा चुकीचा उपचार केल्यास डेंग्यू वाढन्याचा व जीव जाण्याचा धोका असतो, त्यामुळे सर्वांनी विशेष काळजी घेऊन स्वच्छता राखावे, लक्षणे जानवल्यास तात्काळ डॉक्टरांना भेटून वैद्यकीय उपचार घ्यावे. मच्छरदानी व मच्छर मारनीचा वापर करावे सर्वांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले आहे.