गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या

79

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

– कनेक्टिव्हिटी बंद असल्याने पर्यायी उपाययोजना करुन मदत पोहचविण्याची आवश्यकता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १९ जुलै : गोसीखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये महापुराचे संकट निर्माण झाले असून शेतकऱ्यांची शेती पूर्णतः पाण्याखाली आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड संकट कोसळली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आज विधानसभेत चर्चेच्या माध्यमातून केली.

गडचिरोली व चामोर्शी तसेच तालुका स्तरातील वेगवेगळ्या नद्यांना आलेल्या पुरामुळे मार्ग बंद झालेले असून, अनेक गावे पाण्याखाली आलेली आहेत. त्या गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटलेला असून त्यांना तातडीने मदत पोहोचावी यासाठी शासनाने योग्य त्या पर्यायी उपाय योजना कराव्यात, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.