गडचिरोली आगारात महिला प्रवासांची गैरसोय

65

– टॉयलेट व कॅन्टीन उपलब्ध करून देण्याची रेखाताई डोळस यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा महिला आघाडी मोर्चाच्या वतीने प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस यांच्या नेतृत्वात गडचिरोली आगार येथे व्यवस्थापकांची भेट घेऊन आगारातील परिसरातील प्रवासांच्या गैरसोयीची पाहणी केली असता दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न व महिला प्रवाशांची होत असलेली गैरसोयीचा प्रश्न गंभीर होत असल्याचे दिसून आले. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बस आगारात महिलांसाठी व्यवस्थितपणे मुत्रीघर नाही. मुत्री घरामध्ये दुर्गंधी, अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य दिसून आले. त्यासाठी महिला मुत्रीघरात स्वच्छता करून तिथे सॅनिटायझर व पॅड मशीन लावावे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे प्रवाशांना नास्ता ताजा मिळावा व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कॅन्टींगची व्यवस्था चांगल्या प्रकाराची हायजेनिक असावी. बस डेपोत प्रवाशांना विश्रांती करण्याची व बसण्याची व्यवस्था स्वच्छ असली पाहिजे. गडचिरोली आगारामध्ये एकूण 107 बसेस आहेत. त्यापैकी 43 मेकॅनिकल आहेत. तसेच गडचिरोली आगारातील बस डेपोला एसी. कंडिशनरची बस उपलब्ध नसल्याची बाब प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळ्स यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली.